आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी; UIDAIने जारी केली नोटीस

182

आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्वाचे असे कागदपत्र आहे. जवळपास सर्वच सरकारी कागदपत्रे आणि बँक खात्यांना आधार कार्डसोबत लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आधार कार्डची व्याप्ती ही वाढत आहे. तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. UIDAIकडून नागरिकांना सतत महत्त्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. दरम्यान, नुकतीच UIDAI ने एक नोटीस जारी केली आहे.

(हेही वाचा – आता एलॉन मस्क परफ्यूम विकणार? काय आहे कारण? नाव अन् किंमत ऐकून…)

तुमचे आधार कार्ड जर १० वर्ष जुने असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. UIDAIने एक नोटीस जारी केली असून यामध्ये ज्या नागरिकांनी १० वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले असेल तर त्यांनी त्यांची कागदपत्रे आणि इतर तपशील अपडेट करावा, असे या नोटीसमध्ये नागरिकांना सांगण्यात आले आहे.

काय केले UIDAIने निवेदन

आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्याचे काम ऑनलाईन आणि आधार कार्ड केंद्रांना भेट देऊन तुम्हाला करता येणार आहे. मात्र माहिती अपडेट करण्याचे काम बंधनकारक करण्यात आलेले नाही. या निवेदनानुसार, ज्या व्यक्तींनी १० वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले आहे अशा व्यक्तींना दस्तऐवज अपडेट करण्याची विनंती करण्यात आली आहे. आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्हाला MyAadhaar पोर्टलला भेट द्यावी लागणार आहे. याशिवाय अपडेशनचे हे काम तुम्ही ऑफलाईन म्हणजे आधार केंद्रावर जाऊनही करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.