महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या कुमार कुणाल मदन साळुंखे याची महाराष्ट्र हॉकी (वयोगट १६) संघात निवड झाली आहे. मुंबई हॉकी असोसिएशनच्या ऑल इंडिया हॉकी संघामधून वयोगट १६ साठी झालेल्या निवड चाचणीद्वारे कुणाल साळुंखे याची निवड करण्यात आली.
( हेही वाचा : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट! केंद्र सरकारने जाहीर केला ७८ दिवसांचा बोनस )
महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सर्व स्तरातून कौतुक
एसएनबीपी (SNBP) यांच्या विद्यमाने आंतर राज्यस्तरीय ज्युनियर हॉकी स्पर्धांचे आयोजन दिनांक ३० सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये पुणे बालेवाडी येथील क्रिडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्कूल नॅशनल क्रिडा स्पर्धेकरीता निवडलेल्या महाराष्ट्र संघामधून कुमार कुणाल मदन साळुंखे याने उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याने केलेल्या या कामगिरीमुळे कुणालचे व महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सुर्यकांत पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर, हॉकी प्रशिक्षक राजेंद्र तिवारी, सर्व क्रिडा विभागातील प्रशिक्षक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्गाकडून कुणालचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community