अडीच वर्षांपूर्वी भाजपशी फारकत घेतलेल्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निधर्मी विचारांच्या पक्षांसोबत जाऊन हिंदुत्वाच्या विचाराशी फारकत घेतल्याचा आरोप होत होता, त्यात तथ्य असल्याचे पुरावे आता मिळू लागले आहेत. आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात हिंदुत्वाच्या विचारांचा द्वेष करणाऱ्या सुषमा अंधारे या उपनेत्या झाल्या असून शिवसेनेची विचारधारा पुरोगामी असल्याचे सांगू लागल्या आहेत. त्यात भर म्हणून बुधवारी, १२ ऑक्टोबर रोजी चक्क पुरोगामींची फौज उद्धव ठाकरे यांना भेटायला आली, ज्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचे परंतु तुषार गांधी आणि मेधा पाटकर यांचा समावेश होता.
‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत भेट
गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानांतर्गत ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. या अभियानांतर्गत तुषार गांधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळे मात्र राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तुषार गांधींसह फिरोज मिठीबोरवाला यांनी या अभियानांतर्गत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे या प्रसंगी उपस्थित होत्या. या अभियानात डॉ. जी.जी. पारीख, मेधा पाटकर यांच्यासह देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे. आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आमची एकजूट दाखवण्यासाठी आलो आहोत. आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून ‘नफरत छोडो, संविधान बचाव’ अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचे आवाहनही आम्ही त्यांना केले आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
(हेही वाचा शिवसेना हिंदुत्वावादी नव्हे पुरोगामी!)
Join Our WhatsApp Community