मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या दुसऱ्या सत्राच्या म्हणजेच हिवाळी सत्र परीक्षा या दिवाळीनंतर घेण्यात येणार असा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी झाला. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर परीक्षा तयारीसाठी कमी वेळ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. मात्र यानंतर सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – शिंदे-फडणवीसांकडून बदल्यांचा बंपर धमाका, राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर)
मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्र परिक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या असून या परीक्षा ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होत असून यातील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या तृतीय वर्ष बीए आणि बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षा ४ नोव्हेंबर तर तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ ची परीक्षा १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होत आहेत. तर हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाकडून दरवर्षी चार विद्याशाखेच्या ४५० पेक्षा जास्त परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठाकडून २०२२ च्या हिवाळी सत्राच्या मानव्यविद्याशाखेच्या एकूण ८० परीक्षा, वाणिज्य विद्याशाखेच्या ९६ परीक्षा, विज्ञान विद्याशाखेच्या ९४ परीक्षा तर आंतर विद्याशाखेच्या १०९ अशा ३७९ परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community