आधार, पॅन अपडेट करताय? सावधान… लिंक पाठवून खात्यातून गायब केले 97 हजार

162

आधार, पॅन अपडेट करण्यासाठी वारंवार मेसेज व्हायरल होत असतात. मात्र यासंदर्भात सरकारकडून वारंवार सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत. दरम्यान,  पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी एकाने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करीत ओटीपी नंबर टाकताच 97 हजार रुपये गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

(हेही वाचा – MSRTC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! राज्य सरकारची एसटी महामंडळाला 300 कोटींची मदत)

याप्रकरणी कोलकाताच्या सायबर भामट्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद शेख अली शेख रा. सुंदर इस्टेट न्यू मार्केट कोलकाता वेस्ट बंगाल असे आरोपीचे नाव आहे.

नागनाथ भगवान कर्हाडे रा. साईनगर बजाज नगर वाळूज एमआयडीसी यांनी फिर्याद दिली. 27 ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ते घरी असताना आरोपीने त्यांच्या मोबाइलवर पॅनकार्ड लिंक करण्यासाठी एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केले असता ओटीपी क्रमांक आला. कर्हाडे यांनी ओटीपी क्रमांक टाकताच त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून 97 हजार रुपये वजा झाले. आपण फसवले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.