अंधेरी पोटनिवडणुकीबाबत अजूनही सत्ताधारी भाजप आणि ठाकरे गट, शिंदे गट पक्षाकडून कोणालाच उमेदवारी जाहीर झालेली नाही. दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार होती. परंतु ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्यापही मुंबई महापालिका प्रशासनाने मंजूर केलेला नाही. याबाबतच निर्णय गुरूवारी होणार आहे. अशातच यासर्व वादात एका मनसे नेत्याने खळबळजनक ट्विट करून चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – MSRTC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! राज्य सरकारची एसटी महामंडळाला 300 कोटींची मदत)
ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही. तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली असून यावर गुरूवारी होणार असताना मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, ऋतुजा लटके यांचा जागा विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्यासाठी अनिल परब यांचा सगळा डाव असल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केला आहे. हा डाव शिंदेंचा असल्याचे परब म्हणत होते. मात्र मनोज चव्हाण यांनी आता यात ठाकरे गटाचा हात असल्याचा दावा केला आहे.
काय म्हटले आहे ट्विटमध्ये
मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे. लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकेच या आशयाचे त्यांनी ट्विट करत अनिल परबांवर आरोप केला आहे.
Join Our WhatsApp Communityमुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच…..@News18lokmat @TV9Marathi @saamTVnews @abpmajhatv @zee24taasnews
— Manoj B Chavan waterman (@ManojBChavan5) October 12, 2022