‘या’ कंपनीचा मोठा निर्णय; 2 हजार 500 कर्मचा-यांना नोकरीवरुन काढणार

148

देशातील ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्रातील मोठं नाव असेलली कंपनी म्हणजे बायजू. या बायजू कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च 2023 पर्यंत 5 टक्के म्हणजेच सुमारे 2 हजार 500 कर्मचा-यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय Byju या कंपनीने घेतला आहे. तर दुसरीकडे 10 हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही कंपनीने घेतला आहे. ही कंपनी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा: लटके वहिनींनी शिवसेनेचा डाव ओळखावा इतकच, मनसे नेत्याच्या ट्वीटने वेगळाच ट्विस्ट )

10 हजार शिक्षकांना नोक-या

कंपनी नवीन भागीदारांद्वारे परदेशात ब्रॅंड जागरुकता वाढवण्यात लक्ष केंद्रित करणार आहे. याशिवाय, भारत आणि परदेशातील व्यवसायासाठी 10 हजार नवीन शिक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती बायजू कंपनीच्या सह- संस्थापक दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. आम्ही संपूर्ण भारतात आमचा ब्रॅंड निर्माण केला आहे. आता मार्च 2023 पर्यंत अधिक नफा मिळवण्याची योजना आम्ही आखत आहोत. नवीन योजनेमुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असे गोकुळनाथ म्हणाल्या.

बायजूला 2021 मध्ये 4 हजार 588 कोटी रुपयांचा तोटा

मागच्या आर्थिक वर्षात बायजूला 4 हजार 588 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहितीदेखील दिव्या गोकुळनाथ यांनी दिली. बायजूची संपूर्ण भारतात 200 हून अधिक सक्रिय केंद्रे कार्यरत आहेत. 2022 च्या अखेरीस ते 500 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती दिव्या गोकुळनाथ यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.