धक्कादायक! नऊ आसनी स्कूल बसमध्ये चक्क 31 विद्यार्थी कोंबले

114

नागपुरात स्कूल व्हॅनमध्ये शालेय विद्यार्थ्यांना कोंबून नेले जात असल्याचे समोर आले आहे. कामठी येथील अविनाश पब्लिक स्कूलच्या नऊ आसनी व्हॅनमध्य्ये नऊ ऐवजी तब्बल 31 विद्यार्थी असल्याचे पोलिसांना आढळून आले. सध्या आरटीओने ही बस जप्त केली आहे.

नऊ आसनी स्कूल बसमध्ये चक्क 31 विद्यार्थी कोंबल्याने आरटीओने कारवाई करत ही स्कूल व्हॅन जप्त केली आहे. व्हॅन चालकाकडून नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे ही वाहतूक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. 31 विद्यार्थी अक्षरश: त्या बसमध्ये कोंबण्यात आले होते.

( हेही वाचा: ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, “चिन्ह-नाव देताना…” )

आरटीओकडून स्कूल व्हॅन जप्त 

आरटीओ अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या बस चेकींगची मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत या शाळेच्या बसची तपासणी करण्यात आली. तपासणी करत असताना, या नऊ आसनी बसमध्ये चक्क 31 विद्यार्थी कोंबून बसवले गेल्याचे पोलिसांना आढळून आले. हे सर्व विद्यार्थी पहिली ते नववी इयत्तेत शिकणारे आहेत. आरटीओने ही बस जप्त केली असून, ती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर पूर्व येथे जमा करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.