रत्नागिरीचे माजी पालकमंत्री अनिल परब यांचे दापोली तालुक्यातील मुरूड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
₹1,01,25,000 transferred to Ratnagiri Collector Bank Acont today by Govt of Maharashtra, Environment Ministry towards Cost of Demolition of Anil Parab Dapoli Sai Resort NX & Sea Coanch Resort
I am confident that now PWD will start Demolition in next Few Days@BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 12, 2022
मुरूड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वन, पर्यावरण मंत्रालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानंतर राज्य शासनाकडूनही तत्काळ हालचाल सुरू झाली. रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हे रिसॉर्ट तोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. त्यानंतर रिसॉर्ट पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली.
(हेही वाचा – ठाकरे गटाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; म्हणाले, “चिन्ह-नाव देताना…”)
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून रिसॉर्ट पाडण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटी १ लाख २५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रिसॉर्ट पाडण्याची कार्यवाही लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला गेला तसेच साई रिसॉर्ट पाडले जाईल, असे सोमय्यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community