दिवाळीनिमित्त अनेकजण बाहेरगावी जाण्याची तयारी करत आहेत. प्रवासासाठी प्रामुख्याने रेल्वे बुकिंग केले जाते त्यामुळे सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळत नाही. ऑनलाईन वेटिंग तिकिटावर प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. तसेच तात्काळ कोटामधून सुद्धा कन्फर्म तिकीट मिळवणे हे मोठे आव्हान असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल तरीही तुम्ही रेल्वे प्रवास करू शकता.
( हेही वाचा : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन; या आहेत प्रमुख मागण्या)
जर तुम्ही ट्रेनचे ऑनलाईन बुकिंग केले आहे आणि तुमचे तिकीट कन्फर्म नसेल तर भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार ऑनलाईन वेटिंग ट्रेन तिकीट बुकिंगवर प्रवासाला परवानगी नाही. ट्रेनमधून प्रवासासाठी ऑनलाईन वेटिंग तिकीट वैध नाही. हे तिकीट आपोआप कॅन्सल होऊन प्रवाशाला तिकीटाचे संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले जातात. तर रेल्वे सुटण्याआधी तुम्ही स्वत: तिकीट रद्द केले तर काही शुल्क कापून तुम्हाला परतावा मिळेल.
ऑनलाईन वेटिंग तिकीट असेल तर प्रवाशांची मोठी पंचायत होते. अशावेळी तुम्ही साधी विंडो काढून प्रवास करू शकता. तसेच कोणती सीट रिकामी आहे याची माहिती तुम्ही टीटीईकडून घेऊ शकता. चार्ट तयार झाल्यावर टीटीई प्रवाशाला रिकाम्या जागेवर प्रवास करण्याची परवानगी देईल. साधे विंडो तिकीट काढून प्रवास केल्यास तुम्हाला प्रवास करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. परंतु ट्रेनमध्ये कोणतीही जागा रिकामी नसेल किंवा गाडी फुल्ल असेल तर तुम्हाला जनरल मधूनच प्रवास करावा लागेल. कोणतीही सीट अलॉट केली जाणार नाही.
कन्फर्म तिकीट नसेल तर उपलब्ध पर्याय?
- आरक्षण केंद्रावरून साधी जनरल विंडो तिकीट काढणे आणि जनरल डब्यांतून प्रवास करणे.
- प्रवासादरम्यान, रिकामी सीट उपलब्ध असल्यास संबंधित टीटीई अथवा टीसीकडून वेगळे तिकीट काढावे लागेल.
- ऑनलाईन वेटिंग तिकीट कन्फर्म न झाल्यास पूर्ण परतावा मिळेल.
सणासुदीनिमित्त विशेष गाड्या
सणांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने दिवाळीनिमित्त विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे की, दिवाळी आणि छठनिमित्त १७९ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community