IRCTC अंतर्गत संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. यामुळे दहावी पास उमेदवारांना IRCTC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
( हेही वाचा : आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड)
अटी व नियम
- पदाचे नाव – संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक
- पदसंख्या – १०० जागा
- शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण
- अधिकृत वेबसाईट – www.irctc.com
- उमेदवारांनी भारत सरकारची अधिकृत वेबसाईट apprenticeshipindia.org किंवा apprenticeship portal ला भेट देणे.
- अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून प्रथम उमेदवारांना नोंदणी करावी लागेल.
- अर्ज करताना उमेदवाराला स्वत:चे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी यासारखी माहिती भरावी लागेल.
- यानंतर तुम्ही नोंदणीकृत ईमेलद्वारे किंवा उमेदवाराला दिलेल्या कोड आणि पासवर्डद्वारे लॉगिन करू शकता.
दरम्यान, रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर अशी अनेक ट्रेडमध्ये ३ हजार हून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ईस्टर्न रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण केली असावी.
Join Our WhatsApp Community