वंदे भारत २.० या एक्स्प्रेसचे लोकार्पण! हिमाचल प्रदेश ते दिल्ली प्रवास होणार सुसाट

126

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उना ते नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची पाहणी केली आणि रेल्वेगाडीतील सुविधांचा आढावा घेतला. वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण कक्षाची तसेच उना रेल्वे स्थानकाचीही त्यांनी पाहणी केली.

( हेही वाचा : IRCTC मध्ये १० उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी! येथे करा अर्ज)

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील अंब अंदौरा रेल्वे स्थानकावर पंतप्रधानांसोबत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूरही उपस्थित होते.

वंदे भारत २.० या एक्स्प्रेसचे लोकार्पण!

या रेल्वेमुळे हिमाचल प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवास आरामदायी होईल. तसेच उना ते नवी दिल्ली प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. रेल्वे ताफ्यात दाखल होणारी ही चौथी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे. अधिक हलकी आणि कमी कालावधीत उच्च गती गाठण्यात ही रेल्वे सक्षम आहे. वंदे भारत 2.0 अधिक प्रगत आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. वंदे भारत एक्सप्रेस ताशी 0 ते 100 किलोमीटर वेग फक्त 52 सेकंदात गाठते. हिचा कमाल वेग ताशी 180 किलोमीटर पर्यंत आहे. सुधारित वंदे भारत एक्सप्रेसचे वजन 392 टन आहे. आधी ते 430 टन होते. यात मागणीनुसार वाय-फाय कंटेंट सुविधाही आहे. प्रत्येक डब्यात 32 इंचाचे स्क्रीन आहेत. मागील आवृत्तीच्या 24 इंचाच्या तुलनेत प्रवाशांना ते माहिती आणि मनोरंजनाची अधिक सुविधा प्रदान करतात. एक्झिक्युटिव्ह डब्यात 180 अंशात फिरणारी अतिरिक्त वैशिष्ट्यपूर्ण आसने आहेत.

अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज

वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन प्रारुपामध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (आरएमपीयू) आहे यात फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित केली आहे. सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (सीएसआयओ), चंदीगडच्या शिफारसीनुसार, ताजी हवा आणि बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेतील जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासून मुक्त हवा शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी ही प्रणाली आरएमपीयूच्या दोन्ही बाजूला स्थापित केली आहे. वंदे भारत एक्सप्रेस 2.0 अनेक उत्कृष्ट सुविधा आणि विमानासारखा प्रवास अनुभव देते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.