ऑक्टोबर महिन्यात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्याने मुंबईत सकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी बारा वाजता पावसाचा जोर वाढला. कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना छत्री अभावी पावसात भिजावे लागले. परतीच्या पावसामुळे ऑक्टोबर हिटपासून मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
( हेही वाचा : महापालिका निवडणुकीचे तिसरे डोळे सज्ज )
गुरुवारपासून मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर परिसरात पावसाचा जोर कमी राहील, असा वेधशाळेचा पूर्वानुमान होता. सकाळी वांद्रे, वडाळा, गिरगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. मुंबईत गुरूवारी दुपारी परतीच्या पावसाचा जोर वाढला. यामुळे ऑक्टोबर महिन्यात जून-जुलै महिन्यात बरसणा-या पावसासारखे चित्र निर्माण झाले होते. अंधेरी, मरोळ, घाटकोपर, कुर्ला, देवनार, वडाळा येथे अंदाजे तासभर पाऊस सुरू होता. गुरुवारी किमान तापमान २४.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. पावसामुळे कमाल तापमान एका अंशाने खाली उतरेल अशी शक्यता वेधशाळेच्या अधिका-यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community