भर समुद्रात हार्ट अॅटक आलेल्या रूग्णाला भारतीय नौदलाने दिला मदतीचा हात आणि…

164

इराणच्या नौदल अधिकाऱ्याचा खोल समुद्रात बचाव करण्यात नौदलाला बुधवारी यश आले आहे. खोल समुद्रात असतानाच या अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु, भारतीय नौदलाने त्यांना मदतीचा हात दिला. वेळीच दिलेल्या मदतीने अधिकाऱ्याचे प्राण वाचले. त्याला नौदलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या नौदलाची मकरान नावाची युद्धनौका अरबी समुद्रातून मार्गक्रमण करत होती. त्यावेळी युद्धनौकेकडून तात्काळ वैद्यकीय आत्पकालीन स्थितीचा संदेश पाठवण्यात आला. हा संदेश मुंबईतील पश्चिम नौदल कमांडकडे आला. त्यावेळी परिसरात एकही नौदल आणि तटरक्षक दलाची नौका नव्हती.

(हेही वाचा – … म्हणून मुंबईत रविवारपासून जमावबंदी, आकाश कंदिलासह मिरवणुकांवरही बंदी)

नौदलाने कुलाब्यातील ‘आयएनएस शिक्रा’ या तळावरून ‘एएलएच ध्रृव’ हे हेलिकॉप्टर रवाना केले. यानंतर हृदयविकाराचा झटका आलेल्या अधिकाऱ्याला हेलिकॉप्टरमध्ये घेण्यात आले आणि तेथेच त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर मुंबईत दाखल होताच नौदल रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.