अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८४ मधील जीवा महाले मार्गावरील एका खेळाच्या मैदानाला दिवंगत नगरसेवक सुनील यादव यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागील वर्षी सप्टेंबर महिन्यांत मांडण्यात आला आहे. परंतु या मैदानाला यादव यांचे नाव देण्यास तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने आडकाठी घेतल्याची बाब समोर येत आहे. यादव यांचे शिवसेनेत सर्व मित्र परिवार असतानाही त्यांनी यादव यांच्या मृत्यूनंतर राजकारण करण्यासाठी त्यांचे नाव या मैदानाला देण्यास जाणीवपूर्वक आडकाठी आणल्याचा आरोपच या नामकरणाचा प्रस्ताव मांडणाऱ्या भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी केला आहे.
( हेही वाचा : वंदे भारत २.० या एक्स्प्रेसचे लोकार्पण! हिमाचल प्रदेश ते दिल्ली प्रवास होणार सुसाट )
भाजपचे नगरसेवक असलेल्या अभिजित सामंत यांनी प्रभाग क्रमांक ८४ मधील नगर भू क्रमांक ११० येथील खेळाच्या मैदानाचे नामकरण ‘सुनील यादव खेळाचे मैदान’असे करण्याची मागणी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत ०८ सप्टेंबर २०२१च्या बैठकीत केली होती. अंधेरी पूर्व भागात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांचा विभागातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांचे नाव या मैदानाला देण्याची मागणी केली होती. हा प्रस्ताव २४ सप्टेंबर २०२१च्या सभेत मंजूरही करण्यात आला.
या मैदान व बागेचे उद्घाटन करण्यात आले, परंतु अद्यापही नामकरण करण्यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत येवू दिला नाही. कारण या मैदानाला दिवंगत सुनील यादव यांचे नाव होते व या नावाचा सेनेने धसका घेतला होता. हा भूखंड प्रभाग ८४मध्ये येत असून हा भूखंड ३० वर्षांपासून पोहोच मार्ग नसल्याने विनावापर पडून होता. परंतु मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर उद्यान आणि शिक्षण विभागाशी पाठपुरावा करून पोहोच रस्त्याला शाळेतून मंजुरी मिळवली. अर्थात जे काम शिवसेनेच्या नगरसेवकाला २५ ते ३० वर्षे जमले नव्हते ते मी भाजप नगरसेवक बनल्यावर करून दाखवले.
परंतु सुनील यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या मैदानाला सुनील यादव यांचे नाव द्यायचे ठरले, पण जी मंडळी प्रशासनावर दबाव आहे अशी ओरड करत आहे, ती शिवसेना त्यावेळी निवडणुकीपूर्वी सुनील यादव यांचे नाव या मैदानाला दिले जाऊ नये म्हणून उद्योग करत होती, हा कुठला न्याय असा सवाल अभिजित सामंत यांनी केला आहे. त्यामुळे ७ मार्च २०२२ पर्यंत महापालिका अस्तित्वात असेपर्यंत त्यांनी यादव यांच्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे येवू नये याची विशेष काळजी घेतली. विशेष म्हणजे कुणाच्या मृत्यूनंतर राजकारण करू नये अशी आपली सर्वसाधारण धारणा असली तरी यादव हे शिवसेनेतील अनेक नेत्यांचे जवळचे मित्र असूनही त्यांचा नावाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही, याची खंत सामंत यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community