आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र आणि पासपोर्ट ही भारतातील महत्त्वाची ओळखपत्रे आहेत. सरकारी, बॅंकेची कामे, शाळेत प्रवेश घेताना सर्वत्र तुम्हाला ही ओळखपत्र दाखवावी लागतात. परंतु व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सरकारी ओळखपत्रांचे काय होते तुम्हाला माहिती आहे का?
( हेही वाचा : मुंबईच्या विकासाची विस्तृत चर्चा; ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ या विशेष परिषदेचे आयोजन)
पॅनकार्ड रद्द कसे कराल?
पॅनकार्ड हे संबंधित व्यक्तीच्या बॅंक खात्याला लिंक केलेले असते शिवाय बॅंकेतील कोणतेही अन्य काम पॅनकार्ड आणि आधार कार्डाशिवाय होत नाही. त्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पॅनकार्ड आयकर विभागाकडे सरेंडर करणे गरजेचे आहे. संबंधित मृत व्यक्तीची सर्व बॅंक खाती बंद केली आहेत की नाही याची दक्षता घ्यावी. पॅनकार्ड सरेंडर करण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. अर्ज करताना संबंधित व्यक्तीचे नाव, जन्म दाखला, मृत्यू प्रमाणपत्र जमा करावे लागते.
आधार कार्ड रद्द कसे कराल?
आधारकार्डाचा गैरवापर टाळण्यासाठी तातडीने रद्द करणे आवश्यक आहे. तुम्ही मृत व्यक्तीच्या आधारचा गैरवापर टाळण्यासाठी UIDAI वरून आधारकार्ड लॉक करू शकता. आधारकार्डच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती कोणत्याही अनुदानाचा लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती संबंधित विभागाला द्यावी.
मतदान ओळखपत्र रद्द करण्यासाठी प्रक्रिया
मतदान ओळखपत्र रद्द करण्यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म-७ भरावा लागेल. त्यानंतर हे कार्ड रद्द केले जाईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पासपोर्ट कालमर्यादा
पासपोर्ट रद्द होऊ शकत नाही कारण तुमच्या पासपोर्टवर कालबाह्यता तारिख नमूद केलेली असते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या पासपोर्टची कालमर्यादा संपेपर्यंत जपून ठेवा.
Join Our WhatsApp Community