दिवाळीत प्रवाशांची मागणी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) पुणे-नागपूर मार्गावर १९ ऑक्टोबरपासून शिवनेरी एसी बसच्या अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहेत. एसटीच्या वाकडेवाडी येथील स्थानकातून या बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे आणि नागपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी २३ ऑक्टोबरपर्यंत अतिरिक्त गाड्या धावणार असल्याचे एसटीच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले.
( हेही वाचा : मुंबईच्या विकासाची विस्तृत चर्चा; ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ॲट 2034’ या विशेष परिषदेचे आयोजन)
१९ ऑक्टोबरपासून अतिरिक्त शिवनेरी गाड्यांचे नियोजन
दिवाळीमध्ये पुण्यातून सर्वाधिक मागणी विदर्भात जाण्यासाठी असते. त्यात नागपूर आणि अमरावती भागांत जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. या मार्गावर खासगी प्रवासी गाड्यांनाही मोठी मागणी असते. दिवाळीच्या कालावधीत काही खासगी वाहतूकदार मनमानी पद्धतीने भाडेवसुली करीत असल्याच्या तक्रारीही दरवर्षी होतात. प्रवाशांची मागणी लक्षात घेता एसटीकडूनही अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देण्यात येतात. त्यानुसार १९ ऑक्टोबरपासून अतिरिक्त शिवनेरी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community