राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे हे बेपत्ता झाले असून, त्यांनी सारोळा येथील निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर शोधकार्य सुरु असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत.
घोरपडे यांचे शेवटचे लोकेशन शिरवळ येथे दिसून आले आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी पहाटे हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली आहे. शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रालगत एका हाॅटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे नेमके कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
( हेही वाचा: भर समुद्रात हार्ट अॅटक आलेल्या रूग्णाला भारतीय नौदलाने दिला मदतीचा हात आणि… )
घटनास्थळी पोलीस पथक दाखल
घटनास्थळी मिसिंग अधिकारी घोरपडे यांचे नातेवाईक यासह राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस नाईक गणेश लडकत, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल बारेला दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community