हिंदू भावविश्वामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. मुंबई-महाराष्ट्रातील हिंदूंनी बाळासाहेबांना आपला नेता मानलं होतं. बाळासाहेबांनी हिंदू समाजाला जे दिलं, त्याबदल्यात हिंदूंनी देखील बाळासाहेबांना खूप काही दिलं. मुंबई महानगरपालिकेवरची अबाधित सत्ता हे हिंदुंच्या एकजुटीमुळेच शक्य झालं. आता उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेतली आहे. भाजप आणि शिवसेना हे राजकीय पक्ष आहेत, त्यांचे काही राजकीय स्वार्थ असणे स्वाभाविक आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यातलं शेवटचं भाषण केलं, त्यात त्यांनी हिदूंत्वाचे प्रखर मुद्दे मांडले. हिंदुंना आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी काही उपदेश केला होता. उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचा उपदेश विसरले आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रामाणिक राहण्याचा उपदेश केला होता. उद्धव ठाकरे भाजपपासून दूर गेले ह्यात चिंता वाटण्याचम कारण नाही, परंतु ते आपल्या वडिलांच्या विचारांपासून खूप दूर गेले आहेत, ही चिंतेची बाब आहे.
पुरोगामीत्वाची शाल पांघरुन फिरणारे जातीयवादी व हिंदूंचे कट्टर विरोधक तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ते म्हणे “नफरत छोडो, संविधान बचाव अभियान” करत आहेत आणि या अभियानात सहभागी करण्यासाठी त्यांनी ठाकरेंची भेट घेतली आहे. स्वयंघोषित पुरोगाम्यांची एक गंमत असते. हे स्वतः संविधानाच्या विरोधात असतात आणि चेहरा मात्र संविधान प्रेमीचा घेऊन फिरतात. राहुल गांधींच्या पणजोबांनी या देशाचे तुकडे केले, या गांधी कुटुंबाने हिंदी-मुस्लिम तेढ निर्माण केला आणि आज राहुल गांधी देश जोडो म्हणत फिरत आहेत. त्यांच्यासोबत भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे कन्हैया कुमार देखील आहेत. एकता पराकोटीचा ढोंगीपणा या लोकांना कसा जमतो हा संशोधनाचा मोठा विषय ठरु शकतो. म्हणजे सेक्युलर लोकांच्या मेंदूवर संशोधन होऊ शकतं.
हे ‘नफरत छोडो, संविधान बचाव अभियान’ कोण करतंय पाहा, मार्क्सवादी विचारांचे लोक ज्यांना संविधानच मान्य नाही. आरे बचाओ आंदोलन, घर बचाओ, भारत बचाओ आंदोलन, फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी, सीएसएसएस, युसूफ मेहरली केंद्र, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन, बॉम्बे कॅथलिक सभा, विद्यार्थी भारती अशा विविध संघटनांनी मिळून हे अभियान सुरु केले आहे. हे अभियान करणारे डाव्या विचारांचे आहेत आणि बाळासाहेब ठाकरेंनी डाव्या विचारसरणीच्या विरोधात संघर्ष केला होता. फिरोज मिठीबोरवाला यांनी सांगितलं की “देशात हेट स्पीच अर्थात एका समूहाला लक्ष करीत द्वेष पूर्ण भावना भडकवल्या जातात. हे कृत्य राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. अशा द्वेषाने दोन धर्म किंवा समूहात सौहार्दाचे नाते बिघडते.”
आता हा एक समूह कोणता आहे? आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की, आपला समूह कोणता आहे? “अब्दुल कलाम” यांचा आहे की “अजमल कसाब” ह्याचा आहे? आपण जर कसाबच्या समूहात असू तर आतंकवादाविरोधात बोलताना आपल्या भावना दुखू शकतात. पण आपण अब्दुल कलाम यांच्या समूहात असू तर आतंकवादाचा नायनाट व्हावा अशी आपली इच्छा असेल. तुषार गांधी किंवा इतर स्वयंघोषित पुरोगामी हे अजमल कसाम ह्याच्या समुहातले आहेत. कारण या लोकांनी नेहमी अतिरेक्यांची साथ दिली आहे. सोनिया गांधींना तर रडू कोसळतं, अतिरेक्याला मारल्यावर. आतंकवाद्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी होणार्या लोकांना ह्यांची सहानुभूती असते. आणि हे स्वतःला पुरोगामी म्हणतात. ह्यांच्यासारख्या दुटप्पी लोकांमुळेच पुरोगामी हा शब्द आता अपशब्द झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता असा लोकांच्या संगतीत आले आहेत. त्यांना नरेंद्र मोदी यांच्याशी समस्या असेल तर समजून घेण्यासारखं आहे, परंतु त्यांना आता मोहन भागवत यांच्याशी म्हणजे संघाशी सुद्धा समस्या आहे. सामनातील “वीर सावरकरांचा अपमान. खेळणे आणि खुळखुळा!” या लेखात संपादक लिहितात, “कॉंग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे.” कोणी सावरकरांवर टिका केली तर सावरकरांचा खुळखुळा होतो का? ठाकरेंनी आत्मसात केलेली ही भाषा कॉंग्रेस आणि सेक्युलर संस्कृतीची आहे. त्यामुळे आता ठाकरेंना सावरकरांशी देखील समस्या निर्माण झालेली आहे.
तुषार गांधी, मार्क्सवादी यांसारख्या हिंदूद्रोह्यांना जवळ करुन उद्धव ठाकरे यांनी हिंदूंना एक संदेश दिला आहे. त्यांचं पुढचं राजकारण कोणत्या मार्गाने चालणार याची ही नांदी आहे. उद्धव ठाकरेंनी खुशाल हिंदूद्रोह्यांच्या गटात जावे परंतु बाळासाहेबांची व हिंदुत्वाची शाल आधी उतरवावी… हिंदू आपली लढाई लढण्यास समर्थ आहेत…
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावां ।
मुलुख बडवावा कीं बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।।
हा समर्थांचा उपदेश हिंदूंनी आपल्या मनावर कोरुन ठेवला आहे उद्धवराव!
Join Our WhatsApp Community