दिवाळीत मिठाई खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

125

21 ऑक्टोबरपासून दिवाळीचा सण सगळीकडे साजरा केला जाणार आहे. आता सण म्हटला की, गोडाधोडाचे पदार्थ मिठाई, फराळ या गोष्टी आवडीने खाल्या जातात. सणाच्या निमित्ताने लोक मिठाई खरेदी करत असतात. मात्र, या सणासुदीतच भेसळीयुक्त मिठाई विकली जाते. अशा वेळी तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

बनावट मिठाईपासून दूर रहा

तुम्ही जर बाजारातून मिठाई विकत घेणार असाल तर तुम्हाला अनेक रंगीबेरंगी मिठाई पाहायला मिळतील. मात्र, या सुंदर दिसणा-या मिठाईपासून दूर राहा. कारण या मिठाईमुळे अॅलर्जी, किडनीचे आजार आणि श्वसनाचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे रंगीबेरंगी मिठाई खरेदी करणे आणि खाणे टाळावे हे लक्षात ठेवा.

मिठाईवर चांदीचे काम पाहून खरेदी करु नका

बाजारात अनेक मिठाईंवर चांदीचा वर्क जास्त दिसून येतो. हा चांदीचा वर्क फार आकर्षित करणारा असतो. त्यामुळे अनेकदा या मिठाईवर चांदीचे काम झाले आहे असे वाटते. परंतु, यामुळे गोंधळून जाऊ नका. कारण आजकाल भेसळ करणारे मिठाई सुंदर बनवण्यासाठी चांदीऐवजी अॅल्युमिनियमचा वापर करतात, जे आरोग्यासाठी घातक आहे. अशा मिठाई टाळल्या पाहिजेत.

( हेही वाचा: पूर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुला आता १० मीटरचा सर्व्हिस राेड; आर.के.मधानी कंपनीचा पुन्हा महापालिकेत प्रवेश )

भेसळयुक्त दूध टाळा

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मावा अगदी सहजपणे वापरला जातो. जे आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. अशा परिस्थितीत दिवाळीची मिठाई खरेदी करताना विश्वासू किंवा चांगल्या दुकानातूनच खरेदी करा. माव्यात दुधाच्या पावडरची भेसळ करणे आरोग्यास हानिकारक आहे. माव्यातील भेसळ समजत नसेल तर त्यावर आयोडीनचे दोन ते तीन थेंब टाकून पहा. माव्याचा रंग निळा झाला तर समजून घ्या की त्यात भेसळ झाली आहे. त्यामुळे दिवाळीला घरीच मिठाई बनवण्याचा प्रयत्न करा. बाजारातून मिठाई घेणार असाल तर भेसळयुक्त मिठाईपासून दूर राहा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.