तुम्हाला पराठे खायला आवडत असतील तर यापुढे तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गुजरातमधील अॅपेलाइट अॅथाॅरिटी फाॅर अॅड्व्हान्स रुलिंग विभागाने पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. AAAR च्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये खूप फरक आहे. चपातीवर पाच टक्के जीएसटी आहे तर पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लागेल. खाण्याच्या बहुतांश सामग्रीवर जीएसटीचा दर पाच टक्के आहे. पण काही खाद्यपदार्थाला विशेष श्रेणात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. AAAR ने गुजरातमध्ये पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावला आहे.
अहमदाबादमधील कंपनी वाडीलाल इंडस्ट्रीज यांनी पराठ्यावरील जीएसटी कमी करण्यासाठी याचिका दाखल केली होती. ही कंपनी रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठे तयार करते. कंपनीच्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये पाच टक्के जीएसटी आकारण्यात यावा. पण एएएआरने वाडीलाल कंपनीचा दावा फेटाळून लावला आणि पराठ्यावर 18 टक्केच जीएसटी लागेल असे स्पष्ट केले.
( हेही वाचा: ठाकरे गटातील ‘या’ माजी आमदाराचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’, ‘भाजपा’त केला प्रवेश )
Parathas Different from Plain Chapatti, Attracts 18% GST: Gujarat AAAR https://t.co/eiNlO4Sapg
— Live Law (@LiveLawIndia) October 13, 2022
मागील अॅथाॅरिटी फाॅर अॅडव्हान्स्ड रुलिंगच्या अहमदाबादमधील खंडपीठाने रेडी टू कूक म्हणजेच फ्रोजन पराठ्यावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने याविरोधात एएएआरमध्ये याचिका दाखल केली होती. पण अॅपेलाइट फाॅर अॅड्व्हान्स्ड रुलिंगने दिलेला निर्णय योग्य असल्याचे एएएआरने सांगितले. अॅथाॅरिटीने सांगितले की, वाडीलाल कंपनी तयार करत असलेल्या पराठ्यामध्ये 36 ते 62 टक्के पीठ अथवा मैदा असतो. त्यासोबत यामध्ये बटाटा, मुळा आणि कांद्याचा समावेश असतो. त्याशिवाय पाणी, मीठ आणि तेलही असते. पण चपातीमध्ये फक्त पीठ आणि पाणी असते.
Join Our WhatsApp Community