एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक नेते, आमदार, खासदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र यंदा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना धक्का दिला नाही तर भाजपने दिल्याचे म्हटले जात आहे. कारण ठाकरे गटाचे माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
(हेही वाचा- ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई पालिकेकडून अखेर मंजूर)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अवधूत तटकरे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. तर नेत्यांचे शिंदे गट आणि भाजपात प्रवेश सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कोण आहेत अवधूत तटकरे
- अवधूत तटकरे हे ठाकरे गटाचे रोहा- श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
- यासोबत ते राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणेही आहेत.
- अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
Join Our WhatsApp Community