सोशल मीडियावर कोणती गोष्ट कशी व्हायरल होईल याचा काही नेम नाही. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये काही गोष्टी मजेशीर, काही थक्क करणाऱ्या तर काही समाज प्रबोधन करणाऱ्या असतात. नुकतीच एक पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतेय. एक फाटकी आणि मळकटलेली जीन्स तब्बल १४२ वर्षांनी विकली गेली. या जीन्सची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल हे नक्की… ‘या’ जीन्समध्ये आहे तरी काय? असा सवाल सध्या सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. या जीन्सच्या पोस्टवर नेटिझन्सच्या प्रचंड प्रतिक्रिया येताना दिसताय.
(हेही वाचा – Indian Railway: ट्रेनच्या बोगीवर असलेल्या ‘या’ पिवळ्या रेषांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?)
ही जीन्स $76,000 डॉलर्सना म्हणजेच 62 लाख रुपयांना विकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आपली जीन्स फाटली, वापरून खराब झाली तर आपण तिला थ्री फोर्थ जीन्स करून वापरतो आणि नंतर टाकून देतो. मात्र एक फाटकी आणि मळकी जीन्स न्यू मेक्सिकोमध्ये 62 लाख रूपयांना विकण्यात आली आहे.
तुम्हाला या पोस्टमध्ये दिसेल की ही जीन्स किती जुनाट आहे. यासह ती इतकी मळकी, फाटकी असून ती ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या लिलाव विक्रीस होती. ओल्ड फॅशन असलेल्या लेव्हिस कंपनीच्या लिलावात तिला 62 लाख मिळाले. तर या लिलावतात डिओगोच्या एका क्लोथिंग डिलरने डेनिम डॉक्टर्सचे मालक जीप स्वीवनसनसोबत मिळून ही जीन्स विकत घेतल्याचे सांगितले जात आहे.
View this post on Instagram
या जीन्समध्ये आहे तरी काय…
ही जीन्स खूप जुनी असून साधारण 1880 सालातील आहे. काही वर्षांपूर्वी जुन्या खाणीत ही जीन्स सापडली आणि तिथल्या काम करणाऱ्या एका मजुराने ही जीन्स आपल्याकडे ठेवून घेतली होती. या जीन्सचे डिझाईन आणि फॅशन खूप ओल्ड आहे. त्यामुळे ही जीन्स सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
Join Our WhatsApp Community