जे जे रुग्णालयात स्तनदा मातांसाठी ‘हिरकणी कक्ष’

201

जे जे समूह रुग्णालयात स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष शुक्रवारपासून सुरु झाला. रुग्णालयाच्या दर्शनी भागांतच ही सेवा रुग्णालयाकडून मोफत दिली जाणार आहे. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन केले आहे. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन आणि अल्केम फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ही सेवा दिली जात आहे.

एका वेळी किमान चार स्तनदा माता लाभ घेऊ शकतात

रुग्णालयात भेट देणा-या माता व बालकांना हा विभाग सुरु करण्यात आला आहे. बाह्य रुग्ण इमारतीतील तळमजल्यात हा कक्ष शुक्रवारपासून सुरु करण्यात आला आहे. एका वेळी किमान चार स्तनदा माता या कक्षाचा लाभ घेऊ शकतात. महिला रुग्णांसह रुग्णालयातील स्तनदा महिला डॉक्टर्स, परिचारिका, महिला कर्मचारी या कक्षाचा लाभ घेऊ शकतात. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. अमिता जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत माने आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. चाइल्ड हेल्थ फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त राजेंद्र पाठक आणि अल्केम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अशोक प्रियदर्शी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, स्तनदा मातांना सुरक्षित वातावरण देणे गरजेचे असते. त्यासाठी रुग्णालयात ही सेवा सुरु करण्यात आली. चाईल्ड हेल्थ फाऊंडेशन आणि अल्केम फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने अनेक गरजू महिलांना या सेवेचा लाभ घेता येईल.

(हेही वाचा मुंबईत उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही – नारायण राणे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.