मुरजी पटेल 100 टक्के निवडून येणार; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा

121

अंधेरी पूर्व विधान सभा मतदार संघातून अनेक वर्षे सेवा देणारे मुरजी पटेलच शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वास शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केला आहे. मतदार येणा-या 3 तारखेला कोणाला आशीर्वाद द्यायचा, हे दाखवून देतील. मुरजी पटेल अनेक वर्षांपासून सेवा करत आहेत. महायुतीचा उमेदवार 100 टक्के निवडून येईल, अशी खात्री मी देतो, असे आमदार लांडे म्हणाले.

ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनता धडा शिकवेल

ठाकरे गटाकडून होणा-या खोकासूर या आरोपावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले खोक्यांचा आरोप सातत्याने होत आहे. पण ज्यांनी चूक केली आहे त्यांनाच हे शब्द लागतील. आमच्याकडून अशी चुक झालेली नाही.  आम्ही गद्दारी केलेली नाही. बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही लोकांसमोर आलो आहोत. ज्यांनी राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे विचार घेतले. गद्दारी केली, त्यांना लोक दाखवून देतील, असे वक्तव्य लांडे यांनी केले आहे.

( हेही वाचा: ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.