ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभम गर्ग असे या भारतीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्यावर वर्णद्वेषातून हल्ला करण्यात आला आहे. सिडनीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी एका २७ वर्षीय संशयिताला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – लटकेंना किती मानसिक त्रास झाला हे त्यांनी मला स्वतः सांगितलं, राणेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप)
शुभमवर हल्लेखोराने चाकूचे ११ वार केले आहेत. या हल्ल्यात शुभमचा चेहरा, छाती आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या शुभमवर सिडनीमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळतेय. शुभमचे कुटुंबीय आग्र्यामध्ये राहत असून हा हल्ला वर्णद्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
शुभमने आयआयटी मद्रासमधून बीटेक आणि एमएससीचे शिक्षण पूर्ण केले असून पुढील शिक्षणासाठी तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला. सिडनीच्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समध्ये शुभम मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएचडीचे शिक्षण घेत होता. अवघ्या दोन आठवड्यांत शुभमवर हल्ला झाला असून हा हल्ला वर्णद्वेषातूनच करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community