भाजप २०१९मध्ये भाजप ज्या लोकसभा मतदारसंघात जिंकू शकला नाही अशा देशभरातील १४४ जागांवर भाजपने लक्ष्य केले आहे. यासाठी प्रत्येक एका केंद्रीय मंत्र्याला यातील २ मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यातील आपल्याकडे गुजरात आणि मुंबईतील मतदारसंघ देण्यात आला आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मुंबईत उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
रमेश लटके असते तर शिंदे गटात असते
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे यांनी शेम्बड्या मुलाविषयी मला प्रश्न विचारू नका, असे सांगत दिवाळी आमचा आहे, दांडिया आमचा नव्हता, वरळी काय कुणाच्या बापाची नाही, वरळी मुंबईत आहे, मुंबई महाराष्ट्रात येथे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिंदे – फडणवीस सरकारचा आहे. उद्धव ठाकरे यांचे काही राहिले नाही. मुंबईतून एकही शिवसेनेचा खासदार येणार नाही यांची आम्ही काळजी घेऊ. रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते, असेही मंत्री नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे गटाचे ऍफिडेव्हिट घोटाळा समोर आला आहे, यांची चौकशी होणार आहे, तसेच याप्रकरणी गुन्हे दाखल होणार आहेत, असेही नारायण राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community