मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभागातील संगीत व कला अकादमी अंतर्गत कला विभागातर्फे महानगरपालिका कर्मचारी व शिक्षक, तसेच मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे मंगळवार ११ ऑक्टोबर २०२२ रोजी लोअर परळ पूर्व परिसरातील ना. म. जोशी मार्ग मनपा शाळा येथे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती. या गटांमध्ये अनुक्रमे मनपा कर्मचारी समकालिन गट, मनपा कर्मचारी पारंपारिक गट व विद्यार्थी गट या गटांचा समावेश होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी काढलेल्या रांगोळ्यांचे प्रदर्शन १८ ऑक्टोबर पर्यंत याठिकाणी पहायला मिळणार आहे.
(हेही वाचा – ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषातून भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, चाकूने केले ११ वार अन्…)
या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांचे अभिनंदन करतांना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी यांनी मनपाचे विद्यार्थी हे शिक्षणाबरोबरच कलेतही पारंगत असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या रांगोळी मध्ये त्यांच्या शिक्षकांचे प्रतिबिंब दिसत असून गुरु शिष्याच्या अतूट नात्याची प्रचिती येत असल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या स्पर्धेचे परिक्षण विजय गोठणकर, सुचिता चापनेरकर व शुभदा पांचाळ या मान्यवरांनी केले. या कार्यक्रमाला उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे व कला विभाग प्राचार्य दिनकर पवार हे उपस्थित होते. हे रांगोळी प्रदर्शन मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. या कार्यक्रमाचे नियोजन कला अकादमीचे सर्व निदेशक, केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुख यांनी केले.
या स्पर्धेतील विजेत्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे
पारंपारीक रांगोळी गट:
- प्रथम पारितोषिक रुपये ५ हजार : राजश्री बोहरा, शिवाजी नगर उर्दू शाळा
- द्वितीय पारितोषिक रुपये ४ हजार : सानिका संदीप राणे, शिवाजी नगर हिंदी
- तृतीय पारितोषिक रुपये ३ हजार : निता किशोर गोहील, अंधेरी (पश्चिम)
उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे प्रत्येकी रुपये २ हजार :
- शितल नेवरेकर, पंतनगर शाळा;
- विणा महेंद्र पाचपोर, शीव एमपीएस;
- अर्चना आनंद दांदळे, माणेकलाल मेहता शाळा एमपीएस
महापालिका विद्यार्थी गट
- प्रथम पारितोषिक रुपये २ हजार ५०० : आकांक्षा अरुण गिरी, हनुमान नगर हिंदी शाळा
- द्वितीय पारितोषिक रुपये २ हजार : रोशनी जगप्रसाद भारती, संभाजी चौक हिंदी शाळा
- तृतीय पारितोषिक रुपये १ हजार ५०० : पूजा अनिल सहानी, कुलाबा इंग्रजी शाळा
उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे प्रत्येकी रुपये १ हजार
- दिपा संतोष जाधव, मानखुर्द मराठी शाळा;
- खुशबू सुभाष मौर्या, पाचपोली हिंदी शाळा;
- रिया गुरुनाथ बोलके, हरियाली व्हिलेज एमपीएस;
- साक्षी गुंडू ढोकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजी शाळा
- तनिष्का संजय शिंदे, पंतनगर पब्लिक स्कूल.
समकालीन रांगोळी गट
- प्रथम पारितोषिक रुपये ५ हजार : दिनेश शंकर रिकामे, बाजार विभाग मनपा हिंदी शाळा
- द्वितीय पारितोषिक रुपये ४ हजार : महेश वामन जगताप, कुर्ला नौपाडा हिंदी शाळा
- तृतीय पारितोषिक रुपये ३ हजार : संतोष जनार्दन बळी, जोगळेकरवाडी हिंदी शाळा
उत्तेजनार्थ पारितोषिके अनुक्रमे (प्रत्येकी रुपये २ हजार) :
- शितल गणेश मयेकर, वर्षानगर एमपीएस विक्रोळी;
- सुधीर शालीग्राम देवकाते, वर्षानगर एमपीएस
- पराग अर्जुन ठाकरे, धारावी काळाकिल्ला एमपीएस.