गाम्बिया देशातील ६६ मुलांच्या मृत्यूमागे हरयाणा येथील मे.मेडेन फार्माक्युटीकल लिमीटेड कंपनी जबाबदार असल्याचा आरोप जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर देशभरात औषध निर्मिती कंपनी व वैद्यकीय क्षेत्रामध्ये चांगलाच गदारोळ माजला. या घटनेनंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनही जागे झाले आहे. बाजारातील द्रव स्वरुपातील ग्लिसरीन सॉरीबिटॉल, पॉलिथिलिन ग्लायकॉल अशा द्रवरुप औषधांची निर्मिती करणा-या औषध कंपन्यांवर नजर वळवली आहे. या औषधांच्या दर्जाची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून लवकरच सुरु होईल.
औद्योगिक वापरासाठी बाजारात उपलब्ध ग्लिसरीनबाबत शंका
मेडेन फार्माक्युटीकल लिमिटेड कंपनीच्या वादात कंपनीने औषध निर्मितीत अशुद्ध स्वरुपाचे डायइथॅलिन ग्लायकॉल आणि इथॅलिन ग्लायकॉलचा अतिरिक्त वापर केल्याचे तपासाअंती उघडकीस आले. या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेत ग्लायकॉल निर्मितीच्या औषध कंपन्यांवर तसेच इतर द्रवरुप औषधांच्या निर्मिती प्रक्रियांवरही नजर ठेवण्यासाठी धाडी टाकण्याची अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांची योजना आहे. बाजारात दोन प्रकारचे ग्लिसरीन वापरले जातात. औषध आणि औद्योगिक या दोन वापरांसाठी वेगवेगळे ग्लिसरीन वापरले जाते. परंतु औद्योगिक वापरासाठी बाजारात उपलब्ध ग्लिसरीनबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांना शंका आहे. सर्व द्रवयुक्त औषधांच्या तपासण्यांचा अहवाल थेट मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयाला देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा एयु बँकेची जाहिरात टाकाऊ, रूढी, परंपरा बदलण्याचा उद्देश जाहिरातींचा नसतो, भरत दाभोळकरांनी सुनावले)
Join Our WhatsApp Community