कोरोनानंतर अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एकूण ९९० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२२ आहे.
( हेही वाचा : कारमधील सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक! १ नोव्हेंबरपासून नवे नियम; अन्यथा भरावा लागेल दंड)
अटी व नियम
- पदांचे नाव – वैज्ञानिक सहाय्यक ( भारतीय हवामान परीक्षा २०२२)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- वयोमर्यादा – वैज्ञानिक सहाय्यक भरती २०२२ साठी वयोमर्यादा कमाल ३० वर्षे आहे. उमेदवाराचा जन्म १९ ऑक्टोबर १९९२ पूर्वी झालेला नसावा आणि १७ ऑक्टोबर २००४ नंतर झालेला नसावा. केवळ शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल.
- अर्ज शुल्क – Women/SC/ST/PWD/Ex – मोफत
इतर उमेदवारांसाठी – १०० रुपये - अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०२२
- ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२२
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- वेतनश्रेणी – ३५,४०० ते १,१२,४००
पहा संपूर्ण जाहिरात
https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_IMD_30092022.pdf
Join Our WhatsApp Community