ठाण्यात तरुणीचा विनयभंग, रिक्षाने फरफटत नेले, घटना सीसीटीव्हीत कैद

115

ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरच्या परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाने एका तरुणीचा विनयभंग केला, यानंतर त्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षाचालकाने फरफटत नेले. संबंधित घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात या आधीदेखील अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे प्रकरण?

रिक्षाचालक असलेल्या तरुणाने मुलीकडे पाहून अश्लिल शेरेबाजी केली. त्याचा जाब विचारायला मुलगी गेली असता त्याने आणखी अश्लिल वर्तन केले. यामुळे तरुणीने त्याची कॅालर पकडली. तोच रिक्षावाल्याने रिक्षा पळवली आणि मुलीला फरपटत नेले. मुलगी रस्त्यावर पडली आणि तिला दुखापत झाली. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. विकृत तरुणाने तरुणीला फरफटत नेल्याने ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी पळून गेला. रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी तरुणीला रस्त्यावरुन उठवले आणि तिची विचारपूस केली. त्यानंतर तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. काही नागरिकांना आरोपी रिक्षाचालकाला देखील पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पोलीस याप्रकरणी आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

(हेही वाचा एयु बँकेची जाहिरात टाकाऊ, रूढी, परंपरा बदलण्याचा उद्देश जाहिरातींचा नसतो, भरत दाभोळकरांनी सुनावले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.