दिवाळीतही जांबोरी मैदान भाजपकडे: येत्या १९ ते २३ ऑक्टोबर मराठमोळ्या दीपोत्सवाचे आयोजन

165
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विभागात पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला शह देण्याचा निर्धार केला आहे. वरळीतील जांबोरी मैदानात जिथे भाजपने दहीहंडी उत्सव करत सेनेच्या बालेकिल्ल्यात मैदान मारले होते, आता त्याच मैदानात भाजप मराठमोळा दीपोत्सव आयोजित करणार आहे. येत्या १९ ते २३ ऑक्टोबरच्या कालावधीत मराठमोळा दीपोत्सव मुंबई भाजपच्यावतीने आयोजित करण्यात येणार असून या दीपोत्सवात आपली खाद्य संस्कृती, वेशभूषा आणि आपल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचा आनंद विभागातील जनतेला लुटता येणार आहे.
वरळीतील जांबोरी मैदानात जिथे शिवसेनेच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. तिथे यंदा मुंबई भाजपने आधीच मैदान बुककरून त्या मैदानावर हंडी बांधत सेनेला मोठा झटका दिला होता. वरळीत सेनेचे तीन आमदार आहेत. माजी पालकमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतील आमदार असून सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे दोन विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळे सेनेच्या तीन आमदारांचे वर्चस्व असतानाच आणखी एक झटका भाजपने तिन्ही आमदारांना दिला आहे.
नवरात्रोत्सवात सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या  शिवडी विधानसभेतील शहीद भगतसिंग मैदानात मराठमोळा गरबा आयोजित करुन भाजपने जनतेत मराठी गरबा आणि मराठी वेषभूषेसह आपल्या संस्कृतीतचे दर्शन घडवले. पारंपारिक मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा करणाऱ्या पहिल्या स्पर्धकांना  महिला  पुरुष गटाला आयफोन भेट देऊन या गरब्याची क्रेझ वाढवली.
( हेही वाचा: मुंबई आणि ठाणेकडे जाणारा ‘हा’ मार्ग चार दिवस बंद; हे आहेत पर्यायी मार्ग )

या मराठमोळ्या गरबाच्या आयोजनासाठी पुढाकार घेणारे भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच जांबोरी मैदानात मराठमोळा दीपोत्सव आयोजित केला जाणार आहे. येत्या १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत हा दीपोत्सव होणार असून यात विविध प्रकारची खाद्य संस्कृती पहायला मिळणार आहे आणि सोबतच त्याचा आस्वादही घेता येणार आहे. याबरोबरच मराठी गायकांची गाण्याचा कार्यकम आणि मराठी संस्कृतीतील वेशभूषाही  पहायला मिळणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.