राष्ट्रावर नितांत प्रेम करणाऱ्या जापनीस माणसासारखे तुम्ही सुद्धा राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे असाल, तर एवढेच करा, ‘हलाल’चा स्टॅम्प असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. शुक्रवारी, १४ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘आधुनिक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, ‘सावरकर विचार मंच’चे अध्यक्ष संतोष कानडे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सह कार्यवाह स्वप्नील सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्यवाह उत्तम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जपानच्या नागरिकांनी अमेरिकेच्या उत्पादनांवर टाकलेला बहिष्कार
हलाल सर्टीफाईड प्रॉडक्ट् विकून त्यातून मिळणारा पैसा हा इस्लामिक दहशतवादाची ताकद वाढवण्यासाठी शस्त्रास्त्रे खरेदीसाठी वापरला जात आहे. अशा रीतीने हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्स इतकी उलाढाल होत आहे, तोच पैसा इस्लामिक टेरेरिजमची ताकद वाढविण्यासाठी वापरला जातो आणि त्यातला एक कसाब आमच्या माथ्यावर येतो आणि दोनशे अडीचशे माणसे मारतो, असेही शरद पोंक्षे म्हणाले. अणूहल्ल्यात बेचिराख झालेल्या जपान राष्ट्राला पुन्हा उभे करण्याची जबाबदारी अमेरिकेवर देण्यात आल्यानंतर, अमेरीकेने त्या काळात जापानमध्ये दुकाने, शोरूम, हॉटेल्स, मॅकडोनाल्ड सुरू केले होते. आपल्या राष्ट्रावर नितांत प्रेम करणाऱ्या जापनीस माणसाने मनोमन एकच ठरवले, कुठलेही आंदोलन नाही, मोर्चे नाही की व्हाट्सअप मेसेज नाही किंवा ग्रुप नाही. त्यांनी हे काम गुपचूप केले, त्यांनी अमेरिकेने आपली वाट लावली, आपण त्यांचे प्रोडक्ट विकतच घ्यायचे नाही, असे ठरवले. म्हणून काय त्यांचे आयुष्य थांबले नाही, त्यांनी स्वतःचे प्रोडक्ट बनविण्यास सुरुवात केली, सुंदर वाहने बनवली, याला म्हणतात युनिटी, याला म्हणतात सामान्य माणूस काय करू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले, असेही पोंक्षे यांनी सामान्य माणसांची ताकद काय करू शकते हे उदाहरणासह स्पष्ट केले. ‘आपल्या देशामध्ये २०-२२ वर्षांनंतर महाभयानक संकट आपल्या उंबरठ्यावर येऊन थांबले आहे, त्याचे नाव आहे ‘हलाल’. हे संकट थोपवण्यासाठी जपानचे उदाहरण लक्षात घ्या, असेही शरद पोंक्षे म्हणाले.
(हेही वाचा अहो सामनाचे संपादक; सावरकरांचा नव्हे तर शिवसेनेचा खुळखुळा झाला आहे)
भारतासाठी ही चेतावणी
५६ मुस्लिम राष्ट्रांमध्ये हलाल स्टॅम्प असलेल्याच वस्तू विकण्यात याव्यात, असा त्यांनी निर्णय घेतला आहे, त्यांच्या देशात एखादे प्रॉडक्ट् विकायचे असल्यास त्याला हलाल सर्टीफाईड करून त्याच्यावर हलालचा स्टॅम्प मारल्यानंतर ते अधिकृत ठरवले जाईल असे त्यांच्या देशात सुरू करण्यात आले आहे, हळूहळू त्याचे लोन जगभर पसरायला लागले आहे, भारतात काही दुकानांमधील वस्तूवर हलालचा स्टॅम्प दिसू लागला आहे, भारतात त्या मंडळींनी हॉटेल सुद्धा हलाल सर्टीफाईड करून घेतले आहे, ही खूप मोठी चेतावणी आहे, हलाल सर्टीफाईड प्रोडक्ट विकून येणारा पैसा इस्लामिक दहशतवादाची ताकद वाढविण्यासाठी वापरला जात आहे. सामान्य माणसांनी केवळ एवढेच केले पाहिजे की, कुठल्याही दुकानात गेला की, तेथील वस्तूवर ‘हलाल’चा स्टँम आहे की हे बघायचे, हलालचा स्टँप असेल तर त्या वस्तूकडे दुर्लक्ष करा, ही गोष्ट कुणाला बोलायची नाही, गुपचूप करायची, जापनीस लोकांचे उदाहरण समोर ठेवा, वस्तू सोडून द्या हळूहळू त्यांच्या या वस्तू सडतील आणि ‘हलाल’ची सक्ती बंद होईल, असेही शरद पोंक्षे यांनी म्हणाले.
Join Our WhatsApp Community