मुंबईतील विद्यमान रस्त्त्यांवर वारंवार पडणारे खड्डे आणि चांगल्या रस्त्यांवर वारंवार युटीलिटीज करता होणारे खोदकाम रस्त्यांच्या कामांचा दर्जा योग्य राखला जात नसल्याने आता रस्त्यांची कुंडलीच बनवून त्याद्वारे रस्ते कामांचा आराखडा बनवला जाणार आहे. रस्त्यांचा सर्वे करून त्या कुंडलीच्याआधारे बनवण्यात येणाऱ्या बांधकामांसाठी आता सल्लागारांची एक टिमच बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये सहा सल्लागारांची निवड करण्यात आली आहे.
महापालिकेच्या रस्त्यांचा विद्यमान रचनेतील समस्यांचे निराकरण करून त्यांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने काही शहरी संकल्पना सल्लागार अर्थात अर्बन डिझाईन कंसल्टंटचीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागारांच्या माध्यमातून विकास करण्यात येणाऱ्या रस्त्यांसाठीचे सर्व आवश्यक सर्वेक्षण करणे आणि त्यासाठीच्या बांधकामाच्या दृष्टीकोनातून संकल्पचित्रे तथा आराखडाच्या अंमलबजावणीसाठी देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षांकरता सल्लागारांची निवड केली असून सहा सल्लागारांची यासाठी निवड झाली आहे. यामध्ये सल्लागारांच्या पॅनेलमध्ये युडीएआय कन्सल्टंन्टस, आर्कोहम कन्सल्टस प्रायव्हेट लिमिडेट, आय.एम. काद्री आर्कीटेक्ट, शशी प्रभू अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि कास्टा इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षांकरता या सल्लागारांची निवड करण्यात आली आहे.
( हेही वाचा: चांदिवलीतील रुग्णालयाच्या बांधकामासाठी आयआयटीची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती )
मुंबईतील रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अत्याधुनिक पध्दतीचा वापर करण्यासाठी रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्या दृष्टीकोनातून यापूर्वी हाती घेण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या बांधकामांमध्ये युटीलिटीज डकची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व रस्त्यांच्या बांधकामांमध्ये रस्त्यांवरील वाहनांच्या वर्दळीचा वापर करूनही त्यादृष्टीकोनातून आराखडा तयार करून रस्त्यांचे बांधकाम केले जाणार असल्याचे उपायुक्त (पायाभूत सेवा सुविधा )उल्हास महाले यांनी स्पष्ट केले. नियुक्त सल्लागारांच्या माध्यमातून रस्त्यांचे दर्जेदार काम करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.