जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण; पाकिस्तान बांगलादेशहून परिस्थिती गंभीर… आता केंद्र सरकारने दिले हे स्पष्टीकरण

259

जागतिक भूक निर्देशांकात भारताची १०७ व्या स्थानी घसरण झाली आहे. २९.१ गुण असलेल्या भारताला गंभीर श्रेणीमध्ये टाकण्यात आले आहे. भारताचे शेजारी पाकिस्तान(९९), बांगलादेश(८४), नेपाळ (८१) आणि आर्थिक अडचणीत असलेला श्रीलंका ६४ व्या स्थानी आहे. या निर्देशांकांत भारताचे २०२१ मध्ये १०१ वे स्थान होते. यंदा १२१ देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारताची घसरण झाली आहे.

( हेही वाचा : 5G मोबाईल खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा; अन्यथा इंटरनेट स्पीड मिळेल 4G पेक्षा कमी )

अन्न पुरवू शकत नाही हे दाखवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न – केंद्र सरकार 

कन्सर्न वर्ल्डवाईड अँड वेल्थंगरहिल्फ या संस्थेतर्फे दरवर्षी याबाबत अहवाल प्रसिद्ध केला जातो. जगभरात राष्ट्रीय, प्रांतीय आणि स्थानिक पातळीवर उपासमारीची स्थिती काय आहे हे लक्षात येण्यासाठी हा अहवाल महत्त्वाचा असतो. जागतिक भूक निर्देशांक अहवालात भारताला १०७ वे स्थान मिळाल्यानंतर केंद्र सरकारने आपली बाजू मांडली आहे. हा अहवाल भुकेचे योग्य मूल्यमापन करत नसून, चुकीची पद्धत अवलंबली जात असल्याची टीका केंद्र सरकारने केली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले असून देशात भूक आणि कुपोषण संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचा दावा यात केला आहे. जागतिक भूक निर्देशांक काढण्याची पद्धत सदोष असून भारत आपल्या नागरिकांना पुरेसे आणि सकस अन्न पुरवू शकत नाही हे दाखवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे.

दरम्यान, या अहवालानुसार आशियातील केवळ अफगाणिस्तान (१०९) हा एकच देश भारताच्या मागे आहे. या यादीमध्ये चीन, कुवेत या आशियातील देशांसह १७ देश सर्वोच्च स्थानी आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.