काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली असून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या केली. जम्मूमधील शोपियान परिसरात दहशतवाद्यांकडून पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची हत्या करण्यात आली यामुळे परिसरात असंतोष पसरला आहे. जम्मूतील काश्मिरी पंडितांना काश्मिरमध्ये जाण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केली आहे. याविरोधात जम्मूमध्ये जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. यावर्षात टार्गेट किलिंगमध्ये २४ जणांची हत्या झाली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या धर्तीवर ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची दिवाळी बोनसची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन)
J&K | People pay their last respects to Kashmiri Pandit, Puran Krishan Bhat as his mortal remains have been brought outside his residence in Jammu.
He was killed by terrorists in Shopian, yesterday. pic.twitter.com/Ofi9atDMYH
— ANI (@ANI) October 16, 2022
काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची हत्या
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जम्मूतील काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले आहे. काश्मीर खोऱ्यातील शोपियाना येथे ही घटना आहे. सफरचंदाच्या बागेत जाताना दहशतवाद्यांनी पंडित पूरण कृष्ण भट यांनी लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला यात ते जखमी झाल्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
पूरण कृष्ण भट यांच्यावर एका दहशतवाद्याने गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासा आढळले असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community