परतीच्या पावसाचा मुक्काम अजून चार दिवसांनी वाढला…

133

येत्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, पालघर भागांमध्ये पुन्हा सोसाट्याच्या वा-यासह परतीचा पाऊस पडेल. राज्यभरात बुधवारपर्यंत परतीचा पाऊस मुक्कामी असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिली. मात्र दिवाळीच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांतून मान्सून परतला असेल, अशी चिन्हे रविवारी वेधशाळेने जारी केलेल्या अंदाजपत्रातून दिसून आली.

( हेही वाचा : World Green City : देशातली ‘या’ शहराला मिळाला वर्ल्ड ग्रीन सिटीचा बहुमान)

ऑक्टोबर महिन्याचा पंधरवडा सरला तरीही परतीच्या पावसाचा मुक्काम राज्यातील बहुतांश भागांत दिसून येत आहे. जळगाव, डहाणू आदी भागांतून नुकताच शुक्रवारी पाऊस माघारी परतला. मध्य भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात परतीचा पाऊस सक्रिय आहे. रविवारी संपूर्ण विदर्भात जोरदार परतीचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात पाऊस राहील, असे रविवारच्या अंदाजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मध्य महाराष्ट्रात बुधवारनंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होईल. विदर्भात परतीच्या पावसाला रविवानंतर अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे येत्या काही दिवसांतच विदर्भातून पाऊस माघारी फिरेल, असा पूर्वानुमान अगोदरच केंद्रीय वेधशाळेने दिला आहे. तर राज्यातील उर्वरित भागांत पुढच्या आठवड्यापर्यंत पाऊस माघारी जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.