सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विशेष शुल्क आकारून नागपूर ते मुंबई 2 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे.
( हेही वाचा : “भाजपने निवडणूक लढवू नये; ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं”; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र )
नागपूर ते मुंबई गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे…
१. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन वे स्पेशल
01076 सुपरफास्ट स्पेशल दि. 15.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर
२. नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे स्पेशल
01078 सुपरफास्ट स्पेशल दि. 18.10.2022 रोजी नागपूर येथून 13.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.
दोन्ही विशेष ट्रेनची संरचना: दोन द्वितीय वातानुकूलित, 8 तृतीय वातानुकूलित, 4 शयनयान, 5 सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.
आरक्षण : वरील विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. 14.10.2022 पासून सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झालेले आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे रेल्वेने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community