कुख्यात गुंड गजा मारणे अटकेत; खंडणीच्या गुन्ह्यात होता फरार

237

पुण्यातील अट्टल गुंड गजानन मारणेच्या मुसक्या पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आवळल्या आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही करवाई करण्यात आली आहे. साता-यातील वाई जवळच्या अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊसवर भेटण्यासाठी आले असताना, पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

20 कोटी रुपयांची मागितली खंडणी

दोन दिवसांपूर्वी याच टोळीतील कोल्हापूरमधील गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकर याला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले होते. इंदूरमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खून प्रकरणातील प्रकाश बांदिवडेवर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी असे अनेक गु्न्हे दाखल आहेत. सांगली आणि पुण्यात शेअरचा व्यवसाय करणा-याचे वसुलीसाठी अपहरण केले होते. गुंड गजा मारणेच्या टोळीने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती.

( हेही वाचा: मराठा क्रांती मोर्च्याचे रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न; ‘या’ रुग्णालयात उपचार सुरु )

‘या’ पथकाने केले गजा मारणेला गजाआड 

गजानन मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचा-यांनी ताब्यात घेतले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.