वाहतूकीचा नियम मोडल्यास अनेकदा ट्रॅफिक पोलीस गाडीची चावी काढून घेतात. टायरची हवा काढतात किंवा गाडीच्या मागे बसून गाडी बाजूला घ्यायला भाग पाडतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात. अशा परिस्थितीत या संबंधीचे नियम काय सांगतात ते पाहुयात.
- मोटार वाहन कायदा 1988 नुसार, ट्रॅफिक पोलीस वाहकाच्या परवानगीशिवाय गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत. पोलिसांना गाडीच्या टायरची हवा काढण्याची तर अजिबात परवानगी नाही. अशी घटना तुमच्यासोबत घडली तर तुम्ही त्याची रेकाॅर्डींग करुन जवळच्या पोलीस ठाण्यात देऊ शकता.
- वाहक कायद्यानुसार, तुम्ही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला केवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उप निरीक्षक हेच दंड ठोठावू शकतात.
- चालकाला दंड ठोठावताना, ट्रॅफिक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चालान मशीन असणे अनिवार्य असते. जर चालान बुक नसेल अथवा ई-चालान मशीन नसेल तर त्यांना दंड लावता येऊ शकत नाही.
( हेही वाचा: ‘‘…तर नातवाला मी शिवाजी महाराजांची ‘ही’ गोष्ट सांगेन’’; काय म्हणाले राज ठाकरे? )
- कनिष्ठ पोलीस कर्मचा-याला जास्तीत जास्त 100 रुपयांचा दंड लावता येतो. तर वरिष्ठ अधिका-यांना 100 रुपयांपेक्षा अधिकचा दंड लावता येतो. एवढेच काय नियम तोडल्यानंतर तुमच्याकडे दंडाची रक्कम नसेल तर तुम्ही ही रक्कम नंतरदेखील जमा करु शकता.
- ट्रॅफिक पोलीस कर्तव्यावर असताना त्याने वर्दी घालणे अपेक्षित आहे. त्यावर त्याचे नाव, नेमप्लेट असणे गरजेचे आहे. तर पोलीस साध्या वेषात असतील तर त्यांच्याकडे ओळखपत्र असावे.
- वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याच्याकडे वाहनासंबंधीची सर्व कागदपत्रे उपलब्ध असावीत. तसेच, वाहन परवानाही असावा. चूक झाली असेल तर त्याने त्वरीत दंड जमा करावा.