मागील अनेक वर्षांपासून भारतात मुसलमानांचे हलालच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासाठी भारतात उद्योजकांना हलाल प्रमाणपत्र घेण्याची जबरदस्ती केली जाते. अशाच प्रकारे हल्दीरामसारख्या प्रसिद्ध कंपनीने देखील हे प्रमाणपत्र घेतले. आता हलालच्या विरोधात जन आंदोलन उभे होऊ लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे झालेल्या हलाल सक्तीविरोधी परिषदेत हलाल सक्तीविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीने तत्काळ हलाल सक्ती विरोधात ठीक ठिकाणी आंदोलने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हलालमुक्त दिवाळी अशी घोषणा केली आहे. हिंदूंच्या या एकजुटीचा परिणाम म्हणून हल्दीरामने तत्काळ त्यांची हलाल प्रमाणित उत्पादने बाजारातून मागे घेतली आहेत. हा हलाल विरोधात हिंदूंच्या एकजुटीचा पहिला विजय मानला जात आहे.
( हेही वाचा: तुम्ही राष्ट्रावर नितांत प्रेम करणारे असाल, तर हलाल उत्पादने खरेदी करू नका – शरद पोंक्षेंचे आवाहन )
‘हलाल’ची प्रक्रिया पूर्णतः बंद व्हायला हवी – यशवंत किल्लेदार
देशात समांतर इस्लामिक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी ‘हलाल’च्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांविरोधात हिंदूंनी एकजूट दाखवली. त्यामुळेच हल्दीराम सारख्या कंपनीने हलाल प्रमाणित उत्पादने बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण नुसती उत्पादने बाजारातून काढून वा त्यावरचे लोगो काढून पूर्ण उद्देश सफल होणार नाही. कारण, देशांतर्गत उत्पादनांवरील हलाल मार्क काढून टाकला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादने पोहोचवण्यासाठी हलाल वापरला जात आहेच. हलाल प्रमाणपत्रापोटी इस्लामिक संघटनांना जो पैसा मिळतोय, त्या पैशाचा विनियोग नको तिथे होत आहे. ते थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही उत्पादनांचे मानांकन प्रमाणपत्र शासनाकडूनच दिले गेले पाहिजे.