अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; मुरजी पटेल अर्ज मागे घेणार

179

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भाजपकडून याबाबत सोमवारी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

( हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतींवर शिंदे आणि ठाकरे गटाचा निकाल काय? वाचा सविस्तर )

पोटनिवडणुकीतून माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी.टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक होणार 

भाजप उमेदवार मुरजी पटेल हे निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. मात्र त्यानंतरही अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप- शिंदे गटात मुख्य लढत होती. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात अपक्षांची संख्या अधिक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.