पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेलल्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान मोदी दिवाळीपूर्वीच या योजनेचा 2 हजार रुपयांचा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतक-यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहेत.
बारा कोटींपेक्षा जास्त शेतक-यांना या हप्त्याची प्रतीक्षा होती. ऑगस्ट- नोव्हेंबरचा शेवटचा हप्ता 9 ऑगस्टलाच जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भारतीय कृषी संशोधन संस्था पुसा येथे शेतकरी सन्मान संमेलनाचे उद्धाटन करतील आणि याप्रसंगी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे किसान योजनेअंतर्गत शेतक-यांना 16 हजार कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी केला जाईल, अशी केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.
( हेही वाचा: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यावर राज ठाकरेंचे पुन्हा फडणवीसांना पत्र, म्हणाले… )
कसे शोधाल लाभार्थी यादीतील नाव
pmkisan.gov.in या पीएम शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या फार्मर्स काॅर्नर विभागावर क्किक करा. शेतकरी काॅर्नर विभागात लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा. आता पीएम शेतकरी खाते क्रमांक किंवा नोदंणीकृत मोबाईल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. तपशील भरल्यानंतर डेटा मिळवा वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
Join Our WhatsApp Community