काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाला राज्यातून १९ जणांची दांडी

161

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाला राज्यातून १९ जणांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ‘ते’ १९ जण कोण, याविषयी राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

( हेही वाचा : वाहन परवान्यासाठी आता स्वयंचलित वाहन चलन चाचणी पथ; मुख्यमंत्र्यांची घोषणा)

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या ५६१ पैकी ५४२ मतदारांनी (९६%) आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पोस्टल मतदानाचाही समावेश आहे. टिळक भवनमध्ये तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदार पार पडले. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी पल्लम राजू, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया यांच्या देखरेखीखाली हे मतदान झाले.

१९ ऑक्टोबरला निकाल

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व श्री शशी थरूर हे दोन उमेदवार आहेत. मतदानानंतर पोलिंग एजंट व प्रदेश निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत मतपेट्या सील करून दिल्लीला पठवण्यात आल्या. १९ ऑक्टोबरला दिल्ली येथे मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.