अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; लटकेंसह ७ उमेदवारांमध्ये होणार लढत

121

अंधेरीच्या पोटनिवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, वैध ठरलेल्या १४ उमेदवारांपैकी केवळ ७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने उर्वरित उमेदवारांमध्ये प्रत्यक्ष लढत होणार आहे.

( हेही वाचा : नियमित पीक कर्ज फेडणाऱ्यांना मिळणार ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ)

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार १४ पैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे :

१. मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
२. निकोलस अल्मेडा (अपक्ष)
३. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)
४. राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
५. चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
६. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
७. चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

अंतिम लढतीसाठीचे उमेदवार :

१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. नीना खेडेकर (अपक्ष)
५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.