ऑक्टोबर महिना संपायला अवघे 14 दिवस उरले आहेत. या येत्या 14 दिवसांत 9 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची बॅंकेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता येत्या 14 दिवसांत कोणत्या दिवशी बॅंका बंद राहणार आहेत, जाणून घेऊया.
ऑक्टोबर महिना हा सणासुदीचा महिना असतो. या महिन्यात अनेक सण येत असल्याने अधिकतर दिवस बॅंका बंद असतात. येत्या काही दिवसांत देशात दिवाळीपासून गोवर्धन पूजा आणि भाऊबीजपर्यंतचे सण साजरे होणार आहेत. यानिमित्त बॅंका बंद राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला बॅंकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असतील, तर ती त्वरित करुन घ्या.
रिझर्व्ह बॅंकेच्या हाॅलिडे कॅलेंडरनुसार, बॅंकांना दिवाळी, गोवर्धन पूजा, भाऊबीज यासह इतर काही सणांना सुट्टी राहणार आहेत. तसेच, चौथा शनिवार आणि दोन रविवारही या कालावधीत येणार आहेत. 22 ते 24 ऑक्टोबरला सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी राहणार आहे.
( हेही वाचा: शिंदे गटातील ‘या’ आमदाराला ह्रदयविकाराचा झटका;उपचारासाठी एअर अॅम्बुलन्सने मुंबईकडे रवाना )
या दिवशी सर्वत्र बॅंकांना आहे सुट्टी
- 18 ऑक्टोबर- काटी बिहू ( आसाम राज्य)
- 22 ऑक्टोबर -चौथा शनिवार
- 23 ऑक्टोबर- रविवार
- 24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी
- 25 ऑक्टोबर- गोवर्धन पूजा ( मणिपूर, सिक्कीम, तेलंगणा आणि राजस्थान)
- 26 ऑक्टोबर- भाऊबीज/पाडवा
- 30 ऑक्टोबर- रविवार
- 31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जयंती ( रांची, पटणा आणि अहमदाबाद)