हलाल अर्थव्यवस्थेतून निर्माण झालेला आर्थिक जिहाद आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दहशतवादी संघटनांना मिळणारे पाठबळ याला आता देशभक्त हिंदू संघटीत विरोध करत आहेत. हलाल विरोधी कृती समितीने आता सर्व देशभक्तांना ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन केले आहे. मुठभर मुस्लिमांचे लांगुलचालन करण्यासाठी जर भारतीय उत्पादक हलाल प्रमाणपत्र बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारत असतील तर अशा उत्पादनांवर बहिष्कार टाकणे हा सगळ्या गैर-मुस्लिमांचा अधिकार आहे.
हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या इस्लामी संघटना या माध्यमातून आपल्या खिश्यातून अब्जावधी रुपये उकळत असून याचा उपयोग जिहादी दहशतवादाला पाठबळ देण्यात होत आहे. भारतात जमाते इस्लामी हिंद ही संघटना या माध्यमातून आपल्या खिशातून जमा केलेल्या पैशाचा उपयोग, पकडल्या गेलेल्या सगळ्या इस्लामी आतंकवाद्यांना न्यायालयीन लढ्यात मदत करण्यासाठी करत आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात आर्थीक व्यवहार होत असल्याने, आपण एकजुटीने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यास मुस्लीम तुष्टीकरण करणाऱ्या कंपन्यांना धडा मिळेल.
( हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीपूर्वी मिळणार वेतन )
…तर देशद्रोही हलाल सक्ती निश्चितच मोडीत निघेल
या आंदोलनाचा परिणाम दिसू लागला आहे. नागरिकांचा वाढता बहिष्कार बघून ‘हल्दीराम’ सह अनेक कंपन्यांनी हलाल लोगो आपल्या उत्पादनावरून काढला असून, भारतात हलाल प्रमाणित उत्पादने विकणे बंद केले आहे. अनेक दुकान – विक्रेते ‘इथे हलाल प्रमाणित सामान विकले जात नाही’ अशा पाट्या लावत आहेत. अशा वेळी जर सर्व देशभक्त पक्ष-संघटनांनी या मोहिमेला सक्रीय सहकार्य करत आक्रमक प्रचार केला तर देशद्रोही हलाल सक्ती निश्चितच मोडीत निघेल. म्हणूनच हलाल विरोधी कृती समिती सगळ्या देश्भक्तांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करत आहे.
Join Our WhatsApp Community