गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात एका नव्या फसवणूकीची भर पडली आहे. ते म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना फसवणे. या आधीही अनेक प्रकारे तरुणांना फसवले जायचे. मात्र, आता भामट्यांनी ऑनलाईन माध्यमांचा वापर करुन फसवणुकीचे जाळे वाढवले आहे. त्यात अनेकजण अडकत आहेत. फसवणूक होण्यापेक्षा स्वत:ला सुरक्षित ठेवणे हा सर्वोत्तम उपाय. या जाळ्यापासून कसे वाचायचे, याबाबत सरकारनेच काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत.
काही ठराविक पद्धतीचे मेसेज येतात
- तुम्हाला नोकरी हवी का?
- पार्ट टाईम जाॅबसाठी अर्ज करा.
- दररोज 2 ते 5 हजार कमवा.
- नोंदणीसाठी तुम्हाला काही हजार रुपये जमा करण्यास सांगतात.
- नवीन- नवीन कारणे सांगून पुन्हा पैसे मागितले जातात.
- लिंक पाठवून तुमची माहिती पुरवण्यास सांगितले जाते.
- माहिती दिली की, तुमचे बॅंक खाते हॅक करुन पैसे वळवले जातात.
- कोणतीही नामांकित कंपनी नोकरीसाठी तुम्हाला कधीही पैसे मागणार नाही. त्यामुळे कोणालाही पैसे देऊ नका.
- असे मेसेज आले तर समजा हे हमखास स्कॅम आहे. जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे.
( हेही वाचा: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी! दिवाळीपूर्वी मिळणार वेतन )
दुसरी पद्धत
- स्कॅमर्सकडून नामांकित कंपन्यांच्या नावे खोटे एमएमएस पाठवून पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवतात. मोठी कमाई होईल, या आशेने अनेक जण त्यास बळी पडतात.
- Call center वरुन अनेकांना जाॅबबाबत फोन येतात. नोंदणीच्या नावाखाली पैसे जमा करण्यास सांगितले जाते.
कसे स्वत:ला वाचवाल?
- Jobच्या नावाने आलेल्या लिंकवर क्लिक करु नका. कितीही मोठा ऑफर असेल तरीही स्वत:वर नियंत्रण ठेवा.
- अनोळखी व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.
- अशा प्रकारचे मेसेज पाठवणा-यांचे नंबर्स ब्लाॅक करा आणि रिपोर्ट करा.
- सायबर गुन्ह्यांत फसवणूक झाली. तातडीने www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करा.