दाऊद आणि हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन केव्हा करणार? पाकिस्तान अधिकाऱ्याने ठेवले तोंडावर बोट

126

इंटरपोलची ९० वी महासभा यंदा भारतात होत आहे. यात १९५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने या महासभेला सुरूवात झाली असून अमित शहा यांच्या भाषणाने या महासभेचा समारोप होणार आहे. यावेळी भारतात आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्याची दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचे नाव ऐकून बोलती बंद झाली. पाकिस्तानचे फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे महासंचालक मोहसीन बट यांना प्रश्न विचारण्यात आला, दाऊद आणि हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन केव्हा करणार? यावर मोहसीन तोंडावर बोट ठेवून दुर्लक्ष करून खाली बसले.

( हेही वाचा : कोकणला बालेकिल्ला म्हणणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत चोख प्रत्युत्तर – रवींद्र चव्हाण)

इंटरपोलच्या महासभेवेळी एका पत्रकाराने मोहसीन बट यांना प्रश्न विचारला यावर मोहसीन बटने नकार दर्शवला त्यावर पत्रकाराने सांगितले प्रश्न ऐका तुम्हाला हवे असल्यास उत्तर द्या किंवा नका देऊ. त्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुढे जातील का? हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम भारतात मोस्ट वॉन्टेड आहेत, तुम्ही त्या दोघांना भारताच्या हवाली कधी करणार? यावर मोहसीनने तोंडावर बोट ठेवून मौन बाळगले.

इंटपोल म्हणजे काय?

जगभरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी १९२३ मध्ये या संघटनेची स्थापना केली. ही एक आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. त्याची स्थापना व्हिएन्ना, ऑस्ट्रियामध्ये झाली. १९५ देश इंटरपोलचे सदस्य आहेत. १९९७ मध्ये भारतात इंटरपोल महासभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.