BCCI च्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नींची नियुक्ती, तर आशिष शेलार खजिनदार

153

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेल्या बिन्नी यांनी सौरभ गांगुली यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. तर अ‍ॅड. आशिष शेलार यांची BCCI च्या खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे. नवे खजिनदार आशिष शेलार यांच्या हातात ९६२९ कोटींच्या खजिन्याची चावी असणार आहे.

( हेही वाचा : दाऊद आणि हाफिज सईदला भारताच्या स्वाधीन केव्हा करणार? पाकिस्तान अधिकाऱ्याने ठेवले तोंडावर बोट)

सीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होते. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.

अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. रॉजर बिन्नीनं 27 कसोटी सामन्यात 830 धावा केल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत 11 तर एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीनं 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स मिळवल्या आहेत. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.